बुधाच्या महादशेने ‘या’ राशीच्या लोकांना मिळेल छप्परफाड पैसा! १७ वर्षे टिकेल प्रभाव…
Budh Mahadasha Effect: वैदिक ज्योतिषानुसार बुध ग्रह मिथुन आणि कन्या या राशींचा स्वामी आहे. कन्या राशीत बुध उच्च स्थितीत मानला जातो, तर मीन राशीत तो नीच स्थितीत असतो. बुध ग्रहाची महादशा व्यक्तीवर १७ वर्षे चालते. जर जन्मकुंडलीत बुध ग्रह शुभ स्थितीत असेल, तर व्यक्तीला व्यवसायात चांगला पैसा मिळतो. अशी व्यक्ती गणितात हुशार असते आणि तिची तर्कशक्ती चांगली असते. व्यक्ती थोडी विनोदी स्वभावाचीही असते.