कर्क राशीच्या लोकांना ‘मे’ महिना नेमका कसा जाणार? वाचा तुमचं राशिभविष्य…
Kark May Rashibhavishya 2026: चंद्राची रास कर्क आहे. त्यामुळे चंद्राची कोमलता, हळुवारपणा, भावूकपणा कर्क राशीच्या लोकांमध्ये असतो. आपल्यातील कलात्मकता आणि सर्जनशीलता वाखाणण्याजोगी असते. कोणालाही मदत करायला आपण सदैव तत्पर असता. एकटं-एकटं राहण्यापेक्षा आपण समूहासोबत राहणे पसंत करता. कधी उत्साह, तर कधी मरगळ, अशी दोलायमान स्थिती असते. अशा या कर्क राशीच्या लोकांसाठी पुढचा येणारा मे महिना कसा असेल याचा आढावा घेऊया.