आज दुपारी ३:२० वाजता पहिलं चंद्रग्रहण सुरू! मुंबईसह इतर शहरांमधील चंद्रग्रहणाची वेळ वाचा..
Chandra Grahan Time City Wise: आज वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे आणि ते भारतातही दिसणार आहे. त्यामुळे सूतक काळ मान्य केला जाईल. खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या दोन्ही दृष्टीने या चंद्रग्रहणाला विशेष महत्त्व आहे. खगोलशास्त्रानुसार, जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि तिची सावली चंद्रावर पडते, तेव्हा चंद्रग्रहण होते. जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत जातो, तेव्हा तो लाल रंगाचा दिसतो. या अवस्थेला वैज्ञानिक भाषेत ‘ब्लड मून’ असे म्हणतात.