होळीच्या काळात चंद्रग्रहण लागणार! भारतात नेमकं कधी दिसेल? योग्य वेळ, सुतक काळ जाणून घ्या…
Chandra Grahan Time & Sutak Kaal: २०२६ सालची होळी अनेक कारणांनी खास मानली जात आहे. या वर्षी रंगांच्या सणासोबत एक महत्त्वाची खगोलीय घटना घडणार आहे. २ मार्चला होलिका दहन होईल आणि ३ मार्चला वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागेल.
ज्योतिषशास्त्रानुसार हे चंद्रग्रहण सिंह राशीत आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात लागणार आहे. त्यामुळे याचा परिणाम देश आणि जगाबरोबर सर्व १२ राशींच्या लोकांवर होऊ शकतो.