शनीची मंगळावर वक्रदृष्टी; ‘या’ राशींचा सुरू होणार वाईट काळ
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ एका ठराविक काळानंतर राशिबदल करतो. मंगळाच्या राशिबदलामुळे १२ राशींच्या लोकांच्या आयुष्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रभाव पडत असतो. नऊ ग्रहांमध्ये मंगळ हा खूप खास ग्रह मानला जातो. दसऱ्यानंतर मंगळ ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे आणि कर्क राशीत येताच मंगळावर शनीची वक्रदृष्टी पडणार आहे. अशा स्थितीत षडाष्टक नावाचा योग तयार होईल. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींना फायदा; तर काहींना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.