पुढचे ३० दिवस ‘या’ ३ राशींनी जरा सांभाळूनच राहा! केतूच्या नक्षत्र बदलाने वाढणार संकट…
June Horoscope: ज्योतिषशास्त्रात केतूला रहस्य, अध्यात्म, अचानक घडामोडी आणि कर्मफळाचा कारक ग्रह मानलं जातं. जेव्हा केतू आपली चाल, रास किंवा नक्षत्र बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम फक्त वैयक्तिक आयुष्यापुरता मर्यादित राहत नाही, तर करिअर, आर्थिक स्थिती, कौटुंबिक नातेसंबंध आणि मानसिक स्थितीवरही दिसून येतो. याच पार्श्वभूमीवर २९ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजून १६ मिनिटांनी केतू मघा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात प्रवेश करत आहे. ही स्थिती ३० जून २०२६ पर्यंत राहणार असून या काळात काही राशींनी विशेष सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे.