अखेर ‘या’ ४ राशींना मिळणार चांगल्या कर्माचं फळ! लक्ष्मी-नारायण राजयोगाने येईल श्रीमंती…
Lakshmi Narayan Rajyog: लक्ष्मी नारायण राजयोगाला ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. हा योग साधारणपणे राशींवर शुभ परिणाम देतो. ज्योतिष गणनेनुसार, जेव्हा शुक्र आणि बुध हे ग्रह एकाच राशीत किंवा भावात एकत्र येतात, तेव्हा लक्ष्मी नारायण राजयोग तयार होतो.
द्रिक पंचांगानुसार, मे २०२६ च्या शेवटी मिथुन राशीत शुक्र आणि बुध काही दिवसांसाठी एकत्र राहतील, त्यामुळे लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होईल. चला तर मग जाणून घेऊया, या वेळी कोणत्या राशींना फायदा होणार आहे आणि त्यांचे राशिभविष्य काय आहे.