‘मे’ महिना मिथुन राशीच्या लोकांना कसा जाणार? वाचा तुमचं राशिभविष्य
Mithun May Rashibhavishya 2026: मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. बुध बुद्धीचा कारक आहे. चुणचुणीत, हजरजबाबी आणि हुशार असे बुधाचे गुण मिथुन राशीच्या लोकांमध्ये आढळतात. आपली खरी ताकद बोलण्यातच असते. एखाद्याला हाताने नाही तर शाब्दिक फटक्यांनी गारद कराल.
आपले निरीक्षण अगदी बारकाव्यासह असते. विविध विषयात आपणास रस असतो. नवनवीन विषयांची आपणास ओढ असते. स्मरणशक्ती आणि समयसूचकता अफलातून असते. अशा या अस्थिर, अल्लड मिथुन राशीला मे महिना कसा जाईल हे पाहूया.