२०२५ वर्ष ‘या’ तीन राशींसाठी सुखाचं! राहू-शुक्राच्या संयोगाने मिळणार धन, मान सन्मान
ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा संयोग विशेष मानला जातो. जेव्हा दोन ग्रह एकाच घरात असतात तेव्हा त्याला संयोग म्हणतात. कधी कधी ग्रहांच्या संयोगाने अनेक राशींच्या जीवनात चांगले बदल होतात, तर काही राशींना आव्हानांना सामोरे जावे लागते. वैदिक पंचांगानुसार, २०२५ च्या सुरुवातीला २८ जानेवारीला मीन राशीत राहू आणि शुक्राचा संयोग होणार आहे. या संयोगाने काही राशींच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल घडून येऊ शकतात. नवीन वर्षात राहू-शुक्राचा संयोग नेमका कोणत्या राशींच्या जीवनात सुख घेऊन येईल जाणून घेऊ…