वृश्चिक राशीच्या लोकांना ‘मे’ महिना कसा जाणार? वाचा तुमचं राशिभविष्य…
Vrishchik May Rashibhavishya 2026: वृश्चिक ही मंगळाची रास आहे. मंगळाचा बिनधास्तपणा, लढाऊ वृत्ती या राशीच्या लोकांमध्ये दिसून येते. दुसऱ्यांवर हुकुमत गाजवणे, आपल्या मताप्रमाणे वागणे हा यांचा नैसर्गिक स्वभाव आहे. हे लोक कर्तबगार, संशोधक, उत्तम प्रशासक असतात. काही वेळा त्यांच्या निश्चयीपणाचे रूपांतर हट्टामध्ये आणि चिकित्सेचे शंका-कुशंकांमध्ये होते. अफाट निरीक्षण शक्ती, हळवेपणा, राग अशा गुणांचे संमिश्रण असलेल्या वृश्चिक राशीच्या लोकांना मे महिना नेमका जाईल याचा आढावा घेऊया….