२०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या लोकांची तिजोरी धनधान्याने भरणार?
Shani Gochar 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार न्यायाची देवता शनी महाराज नवीन वर्ष २०२५ मध्ये आपली राशी बदलणार आहेत. शनी महाराज एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतात. त्यांना पुन्हा त्याच राशीत परत येण्यासाठी ३० वर्षे लागतात. त्यात नवीन वर्ष २०२५ मध्ये शनी त्याच्या मूळ कुंभ राशीत विराजमान होईल. पण मार्च २०२५ मध्ये शनी राशी परिवर्तन करून मीन राशीत प्रवेश करील. २९ मार्च २०२५ रोजी शनी मीन राशीत गोचर करेल. शनीच्या मीन राशीतील परिवर्तनामुळे अनेक राशींमागची साडेसाती संपून, त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येऊ शकतात.