पुढचे ६ महिने ‘या’ ३ राशींवर शनीची वाईट नजर! वाढणार टेन्शन अन् अडचणी, आताच सावध व्हा
Shani Gochar Neagative Impact: शनी देवांनी १७ मे रोजी रेवती नक्षत्रात प्रवेश केला आहे. आता शनी देव ९ ऑक्टोबरपर्यंत याच नक्षत्रात राहणार आहेत. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, हा गोचर काही राशींसाठी कठीण काळ घेऊन येऊ शकतो. विशेषतः ज्या राशींवर शनीची ढैय्या सुरू आहे (सिंह आणि धनु), त्यांच्यासाठी हा काळ अधिक आव्हानात्मक ठरू शकतो. याशिवाय मिथुन राशीच्या लोकांनाही पुढील काही महिने सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जाणून घेऊया, शनीचं हे गोचर या राशींसाठी कोणते संकेत देत आहे.