३० वर्षांनंतर शनी- मंगळाची युती ‘या’ ३ राशींना करेल कोट्यधीश! अखेर नशिबी श्रीमंतीचा योग…
Shani-Mangal Yuti: वैदिक ज्योतिषानुसार वेळोवेळी ग्रहांच्या संयोगामुळे अनेक महत्त्वाचे योग तयार होतात. या योगांचा परिणाम सर्व १२ राशींच्या आयुष्यावर होतो. काही लोकांसाठी हे योग शुभ ठरतात, तर काहींसाठी अशुभ ठरू शकतात. फ्यूचर पंचांगानुसार सुमारे ३० वर्षांनंतर शनी आणि मंगळ यांचा खास संयोग होणार आहे. हा योग मीन राशीत तयार होईल. ज्योतिषशास्त्रात ही युती खूप प्रभावशाली मानली जाते, कारण शनी हा कर्म, शिस्त आणि न्यायाचा कारक मानला जातो, तर मंगळ हा ऊर्जा, धैर्य आणि पराक्रमाचे प्रतीक मानला जातो.