सूर्य-अरुण युतीने ‘या’ राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती अन् मिळणार भरपूर पैसा
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला राशिबदल करतो. यावेळी अनेकदा ग्रहाशी युती होते किंवा शुभ राजयोग निर्माण होतो. त्यात सूर्याला सन्मान, नेतृत्व क्षमता, ऊर्जेचा कारक मानले जाते. सूर्य देव १२ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजून ५७ मिनिटांनी अरुण ग्रहासमोर ९० अंशांवर असेल. त्यामुळे केंद्र राजयोग तयार होईल. या राजयोगाच्या निर्मितीमुळे १२ पैकी तीन राशींना आर्थिक लाभासह प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकते.