आज ‘या’ ५ राशींवर देवी लक्ष्मीची कृपा! अचानक धनलाभ तर नशिबी मोठं यश…
Today Horoscope 13 March: ज्योतिषीय गणनेनुसार आज १३ मार्च रोजी मेष, कर्क, तुला, वृश्चिक आणि मीन राशींसाठी दिवस खास भाग्यशाली ठरत आहे. आज चंद्रमा दिवसभर धनु राशीत गोचर करत आहे आणि गुरुच्या दृष्टिने शुभ योग तयार होत आहे. तसेच सूर्य, मंगळ आणि बुध यांची युती कुंभ राशीत होत असल्याने मजबूत ग्रहयोग तयार झाला आहे. यासोबतच शुक्राचा मीन राशीत संचार होत असल्यामुळे राजयोग निर्माण झाला आहे. यामुळे आज शुक्रवार असल्याने देवी लक्ष्मीची कृपा आणि मालव्य राजयोगामुळे या राशींना चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे.