“उद्धव साहेबांनी प्रतिसाद दिला पण…”, राजकीय सेटिंगचा उल्लेख करत आदित्य ठाकरेंचं मोठं विधान
महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले होते, ज्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, महाराष्ट्राच्या हितासाठी स्वच्छ मनाने येणाऱ्यांना घेऊन पुढे जाण्यासाठी ते तयार आहेत.