मनोज जरांगे यांचे ११ वे उपोषण, लढा अंतिम असल्याचा दावा
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणातील ५८ लाख नोंदीच्या आधारे सर्वांना कुणबी प्रमाणपत्र द्यावीत या जुन्या मागणीसह जात पडताळणीमध्ये नाकारलेली प्रमाणपत्रेही द्यावीत, या मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे सकाळी दहा वाजल्यापासून उपोषणास बसणार आहेत. दरम्यान उपोषणा दरम्यान चर्चेला जावे लागेल म्हणून राधाकृष्ण विखे पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथे आले आहेत. हे उपोषण अंतिम लढा असल्याचा दावा केला जात आहे. हे जरांगे यांचे ११ वे उपोषण आहे.