Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी येतेय ‘ही’ नवीन बाईक, जबरदस्त लूक, ३३४ सीसी इंजिन अन्…
दुचाकी निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डच्या बाईक्सची तरुणांमध्ये एक वेगळी क्रेझ पाहायला मिळते. परंतु, आता रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी ब्रिटीश बाईक निर्माता ट्रायम्फ आपली नवीन बाईक लाँच करत आहे. या नवीन बाईकमध्ये 400 cc पर्यंत हेवी पॉवर इंजिन दिले जाईल असा अंदाज आहे. सध्या ही बाईक बाजारात आधीपासून असलेल्या स्पीड 400 चे नवीन अपडेटेड व्हर्जन असेल की नवीन बाईक असेल याची माहिती कंपनीने शेअर केलेली नाही.