या वर्षातील सर्वात मोठी ऑफर! नवीन कार खरेदीवर होईल लाखोंची बचत, या कंपन्या देतायत मोठी सूट
डिसेंबर महिना नवीन कार खरेदीसाठी सर्वोत्तम महिना मानला जातो. गाड्यांचा स्टॉक क्लीअर करण्यासाठी कंपन्या अधिक सवलत देतात. एवढंच नाही, तर कार डीलर्स ग्राहकांना अतिरिक्त लाभही देतात. या वर्षीही डिसेंबरमध्ये कार कंपन्या त्यांचे स्टॉक क्लीअर करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. मारुती सुझुकीपासून महिंद्रापर्यंत सर्व जण सवलत देण्यात आघाडीवर आहेत. जर तुम्ही या महिन्यात नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर जाणून घ्या कोणत्या कारवर किती सवलत मिळणार आहे.