मारुतीचा दणका! सर्वाधिक विक्री होणाऱ्या या कारची वाढवली किंमत, पण त्याचा ग्राहकांनाच फायदा
Maruti Suzuki Brezza: देशातील सर्वात मोठी कार विकणारी कंपनी मारुती सुझुकीने त्यांच्या ब्रेझाच्या किमतीत वाढ केली आहे. तथापि, या वाढीव किमतीचा फायदा फक्त ग्राहकांनाच होईल असे कंपनीचे म्हणणे आहे. खरंतर, मारुतीने त्यांच्या ब्रेझामध्ये अनेक नवीन सेफ्टी फीचर्स समाविष्ट केले आहेत, ज्यामुळे या कारची किंमत वाढली आहे. कंपनी या कारमध्ये ६ एअरबॅग्ज अॅड करत आहे.