२०२५ मध्ये टाटा खेळणार नवा गेम! लवकरच लॉंच करणार ‘ही’ लक्झरी सीएनजी कार, किंमत फक्त…
टाटा मोटर्सची कर्व्ह सीएनजी लेसर सध्या भारतीय कार बाजारात चांगलीच चर्चेत आहे. गेल्या वर्षापासून या कारच्या सीएनजी व्हेरिएंटची वाट पाहिली जात आहे. यापूर्वी अशी चर्चा होती की डिसेंबर २०२४ मध्ये ही कार लाँच केली जाऊ शकते. पण आता असं दिसून येत आहे की कंपनी या वर्षी ही कार लाँच करू शकते. या नवीन मॉडेलबाबत टाटा मोटर्सकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. सध्या Curvv पेट्रोल, डिझेल आणि CNG मध्ये उपलब्ध आहे.