टाटाने केली सगळ्यांची बोलती बंद! टाटाच्या एसयूव्हीने ४८ हजार किलोचं विमान ओढून रचला विक्रम
Tata curvv sets record: टाटा मोटर्सच्या गाड्या किती शक्तिशाली आहेत हे संपूर्ण जगाला माहिती आहे, पण टाटा कर्व्ह एसयूव्हीने असा पराक्रम केला आहे की त्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. १५३० किलो वजनाच्या टाटा कर्व्ह एसयूव्ही कर्व्हने ४८,००० किलो वजनाचे बोईंग ७३७ विमान ओढून सर्व विक्रम मोडून आपली ताकद दाखवली आहे. टाटा कर्व्हने एसयूव्ही सेगमेंटमध्ये एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे आणि एक नवीन बेंचमार्क स्थापित केला आहे.