Tata Cars Discounts
1 / 31

Tata Curvv EV देशात दाखल होताच टाटाचा आणखी एक मोठा धमाका!

ऑटो August 9, 2024

देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने आपली बहुप्रतिक्षित कुपे-स्टाईल इलेक्ट्रिक एसयुव्ही Tata Curvv EV नुकतीच लाँच केली. ही कार लाँच करताच टाटाने बाजारपेठेत खळबळ उडवून दिली आहे. कंपनीने आपल्या लोकप्रिय कारवर सूट जाहीर केलं आहे. आता तुम्हाला टाटाच्या कार स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळू शकते.

Swipe up for next shorts
Amitabh Bachchan Apology for wrong pronunciation marathi word
2 / 31

एका मराठी शब्दाचा चुकीचा उच्चार केल्यामुळे अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी, म्हणाले…

महानायक अमिताभ बच्चन यांनी हिंदी सिनेसृष्टीत जवळपास पाच दशक गाजवली आहेत. अजूनही त्यांचा जलवा कायम आहे. सध्या ‘कौन बनैगा करोडपती’चा १६ पर्व अमिताभ बच्चन होस्ट करत आहेत. अशातच बिग बी यांनी एका मराठी शब्दाचा चुकीचा उच्चार केल्यामुळे माफी मागितली आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून मराठी कलाकारांसह नेटकरी त्यांचं कौतुक करत आहेत.

Swipe up for next shorts
urfi javed chemical reactions
3 / 31

उर्फीने दात पांढरेशुभ्र करण्यासाठी वापरला टॉयलेट क्लिनर, तज्ज्ञांनी सांगितले दुष्परिणाम

कॉटेन्ट क्रिएटर आणि अभिनेत्री उर्फी जावेदने अलीकडेच तिच्या चेहऱ्यावर अँटीसेप्टिक लिक्विड वापरले, ज्यामुळे तिच्या चेहऱ्याची जळजळ झाली. तसेच तिने स्वत:चे दात पांढरेशुभ्र करण्यासाठी टॉयलेट क्लिनरचा वापर केला, याबाबत स्वत: उर्फीने धक्कादायक खुलासा केला आहे.

Swipe up for next shorts
Rishabh Pant Litton Das Heated Argument In IND vs BAN 1st Test
4 / 31

“मला रोखून चेंडू का मारतो आहेस…”, ऋषभ पंत आणि लिट्टन दास मैदानातच भिडले, पाहा VIDEO

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक गमावून फलंदाजीला सुरुवात केली, परंतु संघाची सुरुवात खराब झाली. ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वालने डाव सावरला. खेळादरम्यान ऋषभ पंत आणि बांगलादेशचा यष्टिरक्षक लिटन दास यांच्यात वाद झाला, ज्याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. पंतने दोन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. हसन महमूदच्या गोलंदाजीमुळे भारताने तीन विकेट गमावल्या.

Hasan Mahmud Bangladesh Pacer Who Dismissed Rohit Sharma Virat Kohli and Shubman Gill
5 / 31

कोण आहे हसन महमूद? रोहित, विराट, शुबमनला बाद करत टीम इंडियाला टाकलं अडचणीत

भारत-बांगलादेश पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सुरुवात खराब झाली, हसन महमूदने रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहलीला बाद केले. हसन महमूदने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. लंच ब्रेकपर्यंत भारताने ३ बाद ८८ धावा केल्या, यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत नाबाद आहेत.

Indurikar Maharaj Statement
6 / 31

“धर्माचं भांडवल नको, दंगलीत गरीबांच्या पोरांचे बळी..”, इंदुरीकर महाराजांकडून कानउघडणी

इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार आहेत. त्यांनी तरुणांना दंगलीत न पडण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, धर्माचा अभिमान हृदयात असावा. त्यांनी राजकारण्यांना धर्माचं भांडवल न करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, गरीबांच्या मुलांचा बळी देऊ नका, असंही त्यांनी सुचवलं. इंदुरीकर महाराजांनी समाजातील विविध समस्यांवर भाष्य करताना प्रबोधनाचं कार्य केलं आहे त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.

Saturn-Mercury Conjunction
7 / 31

शनी-बुध ग्रहाच्या अद्भूत संयोगाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ

शनी-बुध ग्रहांच्या संयोगामुळे मेष, तूळ आणि कुंभ राशींच्या व्यक्तींना मोठा फायदा होईल. मेष राशीत बुध पाचव्या आणि शनी अकराव्या घरात असल्याने सकारात्मक बदल, व्यवसायात वाढ, आणि नोकरीत प्रगती होईल. तूळ राशीत शनी पाचव्या आणि बुध अकराव्या घरात असल्याने धनलाभ, उत्पन्नाचे नवे स्रोत, आणि शैक्षणिक अडथळे दूर होतील. कुंभ राशीत शनी लग्न भावात आणि बुध सातव्या घरात असल्याने भाग्याची साथ, आर्थिक स्थिरता, आणि वैवाहिक जीवन सुखमय होईल.

When Indira Gandhi met Amitabh Bachchan in Hospital after Coolie injury
8 / 31

रुग्णालयातील बिग बींचे ‘ते’ शब्द अन् ओक्साबोक्शी रडल्या होत्या इंदिरा गांधी

अमिताभ बच्चन यांना 'कुली' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गंभीर अपघात झाला होता. देशभरातील चाहत्यांनी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. २ ऑगस्ट १९८२ रोजी ते रुग्णालयातून घरी परतले. त्यांच्या सासऱ्यांनी १९८९ साली अपघाताबद्दल लेख लिहिला होता. बिग बी रुग्णालयात असताना इंदिरा गांधी भेटायला आल्या होत्या, तेव्हा काय घडलं होतं, ते त्यांनी लेखात सांगितलं होतं.

Rohit Sharma Statement on T20I Cricket Retirement
9 / 31

IND vs BAN: रोहित शर्मा टी-२० मधून निवृत्तीचा निर्णय मागे घेणार? कर्णधाराने दिले उत्तर

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा बांगलादेशविरूद्ध कसोटी सामना खेळत आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी सज्ज आहे. टी-२० विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर रोहितने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने १७ वर्षांच्या कारकिर्दीत १५९ टी-२० सामने खेळून ४२३१ धावा केल्या. रोहितने निवृत्तीचा निर्णयावर मोठे वक्तव्य केले आहे.

Shaqkere Parris Hits 124 meter monster six video viral
10 / 31

शक्केरे पॅरिसने ठोकला १२४ मीटरचा गगनचुंबी षटकार, ॲल्बी मॉर्केलच्या विक्रमाची केली बरोबरी

सीपीएल २०२४ मध्ये त्रिनबागो नाइट रायडर्सचा फलंदाज शक्केरे पॅरिसने १२४ मीटर लांब षटकार मारून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याने आयपीएलमध्ये ॲल्बी मॉर्केलच्या विक्रमाची बरोबरी केली. त्रिनबागो नाइट रायडर्सने गयाना ॲमेझॉन वॉरियर्सविरुद्ध १९.२ षटकांत ५ विकेट्स शिल्लक असताना १४८ धावांचे लक्ष्य गाठले. आंद्रे रसेलने १५ चेंडूत नाबाद ३५ धावा केल्या.

aishwarya rai Bachchan daughter aaradhya Bachchan touches south superstar shiva Rajkumar feet take blessings video viral
11 / 31

सुपरस्टार हात मिळवण्यासाठी पुढे आला पण आराध्या बच्चनने…; ऐश्वर्याच्या लेकीचा पाहा व्हिडीओ

अलीकडेच बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला दुबईत झालेल्या ‘साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवार्ड्स’ (SIIMA 2024) या पुरस्कार सोहळ्यात गौरविण्यात आलं. ऐश्वर्याला ‘पोन्नियिन सेलवन: २’ या चित्रपटासाठी समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. निर्माता कबीर खानच्या हस्ते ऐश्वर्याला हा पुरस्कार दिला गेला. याचे व्हिडीओ, फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. यातील ऐश्वर्याची लेक आराध्याच्य एका व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Himesh Reshammiya Father Passed Away
12 / 31

गायक हिमेश रेशमियाच्या वडिलांचे निधन, संगीत दिग्दर्शक होते विपिन रेशमिया

बॉलीवूडमधील लोकप्रिय गायक व संगीतकार हिमेश रेशमियाचे वडील, संगीत दिग्दर्शक विपिन रेशमिया यांचे निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांमुळे मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल होते. हिमेशची जवळची मैत्रीण वनिता थापरने त्यांच्या निधनाची पुष्टी केली. विपिन रेशमिया यांच्यावर १९ सप्टेंबर रोजी जुहूमध्ये अंत्यसंस्कार केले जातील.

Vivek Oberoi shifted to Dubai
13 / 31

तीन वर्षांपूर्वी मुंबई सोडून दुबईत स्थायिक झाला बॉलीवूड अभिनेता; स्वतः सांगितलं कारण

बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या दुबईत राहतो, जिथे त्याचा व्यवसाय आहे. विवेकने सुरुवातीला व्यवसायासाठी दुबईला जाण्याचा विचार केला होता, पण नंतर तिथेच स्थायिक झाला. त्याच्या विविध स्टार्टअप्समुळे लाखो भारतीयांना मदत मिळते. दुबईत त्याची रिअल इस्टेट कंपनी आहे. विवेकचे मुंबईतही घर आहे आणि तो दोन्ही ठिकाणी वेळ घालवतो.

monkeypox case confirmed in kerala
14 / 31

केरळमध्ये ३८ वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण; यूएईवरून भारतात झाला होता दाखल

काही दिवसांपूर्वीच हरियाणातील हिस्सार येथे २६ वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाली होती. आता केरळमध्येही एका ३८ वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाल्याचं पुढं आलं आहे. या व्यक्तीवर केरळच्या मलप्पुरममधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केरळच्या आरोग्य विभागाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. मंकीपॉक्सची लागण झाल्याचं भारतातलं दुसरं प्रकरण आहे.

Triumph Speed ​​T4 launched in india know its price features and specifications
15 / 31

Triumph Speed ​​T4 झाली भारतात लॉंच; हाय-टेक फिचर्ससह देणार दमदार परफॉर्मन्स, किंमत फक्त…

ऑटो 21 hr ago

ट्रायम्फने भारतात आपल्या 400 सीसी सीरिजमधील लेटेस्ट ट्रायम्फ स्पीड टी4 ही बाईक लाँच केली आहे. ही एक अतिशय हाय-टेक-क्लासिक बाईक आहे; जी केवळ दिसायलाच स्टायलिश आणि ट्रेंडीच नाही, तर तिचा परफॉर्मन्सही दमदार आहे. या लेखातून आपण या बाईकची किंमत, फीचर्स आणि बरंच काही जाणून घेणार आहोत.

Bigg Boss Marathi Season 5 Abhijeet Sawant made a mess in BB Currency task
16 / 31

टास्कमध्ये अभिजीतने केली गडबड, घरातील सदस्यांसह ‘बिग बॉस’नेही घेतली त्याची फिरकी

 ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा आठवा आठवडा दणक्यात सुरू झाला आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ‘शिकाऱ्याची बंदूक’ हा नॉमिनेश टास्क पार पडला. या नॉमिनेशन टास्कमध्ये निक्की तांबोळी, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण आणि वर्षा उसगांवकर या टीमला अपयश मिळालं. त्यामुळे हे पाच सदस्य नॉमिनेट झाले आहेत. सध्या बीबी करन्सीचा टास्क सुरू आहे. याच टास्कदरम्यान अभिजीत सावंतने गडबड केल्याचं समोर आलं आहे.

Success Story of Harshit Godha left London for Avocado Farming now owns 1 crore business in Bhopal
17 / 31

लंडनमध्ये घेतलं बीबीएचं शिक्षण अन् सगळं सोडून धरली शेतीची वाट; हर्षित गोधा यांची यशोगाथा

भोपाळच्या हर्षित गोधा यांनी ब्रिटनमध्ये बीबीएचे शिक्षण घेतले, परंतु अचानक त्यांनी शेती शिकण्याचा निर्णय घेतला. त्याचं झालं असं की, लंडनमध्ये बीबीएचे शिक्षण घेत असताना हर्षित यांना इस्त्रायलमधून आयात केलेले ॲव्हकाडोचे पॅकेट पाहून इस्रायली शेती तंत्रात रस निर्माण झाला. हर्षित यांनी इस्रायली शेतकऱ्यांकडून शेती शिकून २०१९ मध्ये भोपाळमध्ये ‘इंडो इस्रायली ॲव्हकाडो’ नावाची कंपनी सुरू केली. आज ते ॲव्हकाडो शेतीतून भरपूर कमाई करत आहेत. चला, तर मग हर्षित गोधा यांच्या या यशाच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ या.

Vinesh Phogat says Brij Bhushan Singh surviving political power
18 / 31

‘मी राजकारणात येणार नव्हते, पण जेव्हा…’, विनेश फोगटचा मोठा खुलासा; म्हणाली, ‘मला…’

क्रीडा September 18, 2024

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक गमावल्यानंतर विनेश फोगटने कुस्तीतून निवृत्ती घेतली आणि नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ती हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवार आहे. विनेशने राजकारणात येण्याचा निर्णय घेतला कारण तिला परिस्थिती बदलण्यासाठी राजकारणात येणे आवश्यक वाटले. तिला महिलांकडून प्रेम आणि आदर मिळाला. तिच्या निषेधामुळे लोकांच्या मनात स्थान निर्माण झाले.

Flight Attedent
19 / 31

“योग्य अंतवस्त्रे परिधान करा”, फ्लाईट अटेंडंटना विमान कंपनीकडून तंबी!

डेल्टा एअरलाईनने फ्लाईट अटेंडंटसाठी एक मेमो जारी केला आहे. यात व्यवस्थित अंतवस्त्रे घालण्याची तंबी देण्यात आली आहे. फ्लाईट अटेंडंटना ग्राहकांना योग्य सुविधा पुरवण्यासाठी त्यांच्या गणवेशापासून मेकअपपर्यंत सर्व गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जातं. मेमोमध्ये शेव्हिंग, पापण्या, नखे, टॅटू, केस, दागिने, पोषाख याबाबत नियम दिले आहेत. मुलाखतीच्या दिवशी अपशब्द, च्युइंगम, फोन आणि इअरबड वापरण्यास मनाई आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Arbaz Patel got upset when Nikki and Abhijeet were announced as the popular couple
20 / 31

Video: ‘बिग बॉस’ची ‘ती’ घोषणा ऐकताच अरबाज पटेलचा पडला चेहरा, नेमकं काय घडलं?

'बिग बॉस मराठी'च्या घरात बीबी करन्सीसाठी टास्क सुरू आहे. गॅस कनेक्शन पुन्हा सुरू करण्यासाठी सदस्यांना जास्तीत जास्त बीबी करन्सी मिळवायची आहे. आतापर्यंत तीन फेऱ्या झाल्या असून पंढरीनाथ-संग्राम यांनी २० हजार, धनंजय-वर्षा यांनी ३० हजार तर अरबाज-जान्हवीने शून्य करन्सी मिळवली आहे. पुढील भागात उर्वरित जोड्या खेळताना दिसणार आहेत. अशातच अरबाज पटेल 'बिग बॉस'च्या एका घोषणेमुळे नाराज झाल्याचं समोर आलं आहे.

Narendra Modi and Donald Trump
21 / 31

“मोदी विलक्षण माणूस, त्यांची भेट घेणार” – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

देश-विदेश September 18, 2024

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मोदी लवकरच अमेरिका दौऱ्यावर जाणार असून, ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या नेत्यांसोबत क्वाड लीडर्स समिटसाठी ते अमेरिकेत जातील. परराष्ट्र मंत्रालयाने मोदींच्या २१ ते २३ सप्टेंबरच्या दौऱ्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, मोदी पुढील आठवड्यात त्यांना भेटतील आणि मोदी विलक्षण माणूस आहेत.

Virat Kohli and Gautam Gambhir Interview video BCCI share
22 / 31

‘माझ्यापेक्षा तू जास्त वाद घातले आहेस, त्यामुळे तू…’, विराटच्या प्रश्नावर गंभीरचे उत्तर

क्रीडा September 18, 2024

भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेच्या एक दिवस आधी, बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला ज्यात गौतम गंभीर आणि विराट कोहली एकमेकांची मुलाखत घेताना दिसले. गंभीरने विराटच्या २०१४-१५ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा उल्लेख केला, जिथे विराटने शानदार फलंदाजी केली होती. विराटने गंभीरला मैदानावरील भिडण्याबद्दल विचारले, ज्यावर गंभीरने हसून उत्तर दिले की विराट त्याच्यापेक्षा जास्त भिडतो.

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan Ankita Walawalkar Task
23 / 31

सूरज चव्हाणला पाण गेंडा ओळखताना आले नाकीनऊ; सर्व सदस्यांना झालं हसू अनावर, पाहा व्हिडीओ

मनोरंजन September 18, 2024

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा आठवा आठवडा सुरू आहे. आर्या जाधव आणि वैभव चव्हाण घराबाहेर झाल्याने आता नऊ सदस्य उरले आहेत. बीबी करन्सीसाठी टास्कमध्ये पंढरीनाथ-संग्राम यांनी २० हजार, धनंजय-वर्षा यांनी ३० हजार बीबी करन्सी जिंकली आहे. जान्हवी-अरबाजला 'काककुवा' पक्षी ओळखता न आल्याने अपयश आले. टास्कमधील सूरज-अंकिताची फेरी मजेशीर ठरली आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

Voting iin Jammu kashmir
24 / 31

जम्मू काश्मीरमध्ये मतदानाला सुरुवात; दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर जनतेचा कौल कोणाला?

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाले. ९० पैकी २४ जागांसाठी आज मतदान होणार आहे, ज्यात १६ जागा काश्मीर खोऱ्यात आणि आठ जागा जम्मू विभागात आहेत.

Supriya Sule And Rashmi Thackeray
25 / 31

“….तर रश्मी ठाकरे-सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा”, कुणी केलं हे विधान?

महाविकास आघाडीचे ३० खासदार निवडून आल्यामुळे महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त होत आहे. वर्षा गायकवाड यांनी गणपती बाप्पाच्या चरणी राज्याचं राजकारण स्वच्छ करण्याची प्रार्थना केली. त्यांनी भाजपावर टीका करताना ईडी, सीबीआयचा गैरवापर झाल्याचा आरोप केला. महिला मुख्यमंत्रीबाबत प्रश्न विचारला असता, सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे या चेहरा असतील असं विधान केलं आहे.

How to prepare for JEE Main 2025
26 / 31

JEE Main 2025 परीक्षेचा विद्यार्थ्यांनी घरबसल्या अभ्यास कसा करावा?

करिअर September 18, 2024

JEE मेनच्या तयारीसाठी चांगला अभ्यास, अभ्यासाचे योग्य नियोजन व शिस्त असणे आवश्यक आहे. ऑनलाइन स्रोत सहज उपलब्ध असल्यामुळे अनेक विद्यार्थी घरबसल्या अभ्यास करण्याचा पर्याय निवडत आहेत.
विद्यार्थ्यांनी जेईई मेनचा अभ्यास कसा करावा, याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने विद्यामंदिर क्लासेसचे सह-संस्थापक संदीप मेहता यांच्या हवाल्याने याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.

Rohit Sharma Statement on Bangladesh Team Ahead of IND vs BAN Test Series
27 / 31

“मजा घेऊ द्या त्यांनाही…”, रोहित शर्माने इंग्लंडचं उदाहरण देत बांगलादेशला दिला इशारा

क्रीडा September 17, 2024

भारताचा कर्णधार रोहित शर्मा १९ सप्टेंबरपासून चेन्नई येथे सुरू होणाऱ्या भारत-बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी आत्मविश्वासाने बोलला. बांगलादेशने पाकिस्तानविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढला आहे, पण रोहितने सांगितले की भारत आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करतो. इंग्लंडच्या उदाहरणाचा उल्लेख करत रोहितने बांगलादेशला इशारा दिला. भारताचा होम सीझन सुरू होत असून, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत गाठण्यावर संघाचे लक्ष आहे.

akhilesh yadav on supreme court bulldozer order
28 / 31

“ज्यांनी बुलडोझरच आपलं चिन्ह बनवलं होतं…”, सुप्रीम कोर्टाच्या ‘त्या’ आदेशावर..

देश-विदेश September 18, 2024

सर्वोच्च न्यायालयाने बुलडोझर कारवाईसंदर्भात महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशभरात कुठेही बुलडोझर कारवाई होऊ नये, असे निर्देश दिले आहेत. मात्र, सार्वजनिक मालमत्तांवरील अतिक्रमणांना यातून वगळले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या आदेशावर प्रतिक्रिया देत भाजपावर अप्रत्यक्ष हल्ला केला आहे. पुढील सुनावणी १ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Swati Maliwal attacks Atishi brings Afzal Guru angle
29 / 31

‘आतिशीच्या कुटुंबाने अफझल गुरूची फाशी रोखण्याची विनंती केली’, स्वाती मालिवाल यांचे टीकास्र

देश-विदेश September 17, 2024

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी आतिशी मार्लेना यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर स्वाती मालिवाल यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मालिवाल यांनी आरोप केला की, आतिशी यांच्या पालकांनी अफझल गुरूची फाशी रद्द करण्यासाठी लढा दिला होता. मालिवाल यांच्या टीकेनंतर आम आदमी पक्षाचे दिलीप पांडे यांनी मालिवाल यांना राजीनामा देण्याचे आव्हान दिले आहे.

When is Ganesh Chaturthi 2025 in Marathi
30 / 31

पुढच्या वर्षी गणेश चतुर्थी कोणत्या तारखेला साजरी होईल? जाणून घ्या नेमकी तारीख आणि महत्त्व

Ganesh Chaturthi 2025 Date Time : दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला. गणेशभक्त ११ दिवस गणपती बाप्पाची आरती, भजन, कीर्तनात दंगून गेले. बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज अखेर अनंत चतुर्दशीला मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला जात आहे. पण अशा प्रकारे दरवर्षी बाप्पाला थाटामाटात निरोप देऊन पुढच्या वर्षी परत येण्याची विनंती केली जाते. पण, तुम्हाला माहितेय का? पुढच्या वर्षी गणपती बाप्पा नेमके कोणत्या तारखेला विराजमान होणार आहेत? चला जाणून घेऊ तारीख आणि शुभ मुहूर्त…

milk with salt being harmful for health is this true
31 / 31

दुधासह मिठाचे सेवन योग्य आहे का? या मिश्रणाला तुमचं शरीर कसा प्रतिसाद देते?

हेल्थ September 17, 2024

अलीकडेच, मिठासह दुधाचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे दावे करण्यात आले. पॉडकास्टमध्ये हा मुद्दा चर्चिला गेला, ज्यावर कन्टेन्ट क्रिएटर क्रिश अशोक यांनी हे दावे फेटाळले. डॉक्टर अमृत गुरुराज येलसांगीकर आणि आहारतज्ज्ञ कनिक्का मल्होत्रा यांनीही या दाव्यांना वैज्ञानिक आधार नसल्याचे सांगितले. संयमाने मिठाचे सेवन केल्यास आरोग्याला हानी पोहोचत नाही, मात्र अतिसेवनामुळे दीर्घकालीन समस्या उद्भवू शकतात.