टाटा सफारी स्टील्थ एडिशन झाली लाँच; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
Tata Safari Stealth Edition launched: टाटा मोटर्सने गेल्या महिन्यात भारत मोबिलिटी एक्स्पो २०२५ मध्ये सफारी स्टील्थ एडिशनचे अनावरण केले. या कार निर्मात्याने आता सफारीचे हे स्पेशल एडिशन मॉडेल लाँच केले आहे, जे कंपनीच्या वेबसाइटवर सूचीबद्ध केले आहे. अॅकम्प्लिश्ड+ ट्रिमवर आधारित, सफारी स्टील्थ एडिशनची किंमत २५.३० लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. यामुळे ही कार टॉप-स्पेसिफिकेशन सफारी डार्क एडिशन अकम्प्लिश्ड+ ट्रिमच्या बरोबरीची आहे.