१७ वर्षांनंतर येतोय ‘3 इडियट्स’चा सिक्वेल, आमिर खानने दिली माहिती; काय असणार कथा?
आमिर खानने '3 इडियट्स'च्या सिक्वेलची अधिकृत घोषणा केली आहे. २००९ मधील या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमिरने सांगितले की, कथा १० वर्षांनंतरच्या काळावर आधारित असेल आणि मूळ कलाकार आर. माधवन, शर्मन जोशी आणि करीना कपूर पुन्हा दिसतील. चित्रपटाचे चित्रीकरण कधी सुरू होईल याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.