“…आणखी दोन-तीन फ्लॉप चित्रपट झाले तरी हरकत नाही”, आमिर खान असं का म्हणाला?
बॉलीवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान अजूनही 'लाल सिंग चड्ढा'च्या अपयशातून सावरलेला नाही. ऑस्ट्रेलियातील इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये आमिरने सांगितले की, 'लाल सिंग चड्ढा'च्या अपयशाचा धक्का 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'पेक्षा वेगळा होता. त्याला 'लाल सिंग चड्ढा' आवडला होता, पण प्रेक्षकांना नाही. चित्रपट फ्लॉप झाल्यावर आमिर खूप खचला होता, पण कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे सावरला.