आमिर खानने गर्लफ्रेंड म्हणून ओळख करून दिल्यावर गौरीने केलं असं काही की…
आमिर खानने ६० व्या वाढदिवशी त्याच्या गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची ओळख करून दिली. गौरी मूळची बेंगळुरूची असून ती व आमिर दीड वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. गौरीने आमिरसाठी खास वाढदिवसाचा प्लॅन शेअर केला होता. त्यानंतर तिने तिचे पिंटरेस्ट अकाउंट डिलीट किंवा प्रायव्हेट केले. गौरी आमिर खान फिल्म्समध्ये काम करते आणि ती हेअरड्रेसिंग, फॅशन, स्टाइलिंग आणि फोटोग्राफी शिकली आहे.