“६० व्या वाढदिवसाला दारू प्यायलो अन्…”, आमिर खानची ‘अशी’ झालेली अवस्था
अभिनेता आमिर खानने नुकतीच वयाची साठी गाठली आहे. ६० व्या वाढदिवसानिमित्त पार्टीत खूप दारू प्यायल्यामुळे त्याला त्या दिवशी काय घडलं हे आठवत नाही. त्याने दारूच्या व्यसनामुळे एकेकाळी निराशेत असल्याचं सांगितलं आहे. सध्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेल्या आमिरने 'मॅशेबल इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत दारू सोडल्याचं स्पष्ट केलं आहे.