रणवीर सिंहच्या ‘धुरंधर २’ने जिंकलं आमिर खानचं मन, नेमकं काय म्हणाला मिस्टर परफेक्शनिस्ट?
आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला 'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट चर्चेत आहे. आमिर खानने चित्रपटाचे कौतुक करत आदित्य धर आणि टीमचे अभिनंदन केले आहे. 'आमिर खान प्रॉडक्शन'च्या इन्स्टाग्रामवरून आमिरने चित्रपटातील कलाकारांची प्रशंसा केली. 'धुरंधर २' ने १२व्या दिवशी १७.८० कोटींची कमाई केली असून, वर्ल्ड वाईड कलेक्शन १,४९२.१७ कोटी रुपये झाले आहे.