“ते आता ६० वर्षांचे झालेत, त्यांना बघण्यात रस नाही”, शाहरुख-सलमान-आमिर खानबाबत विधान
गेल्या काही दशकांपासून बॉलीवूडवर आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान यांचं अधिराज्य होतं. मात्र, आता प्रेक्षकांची आवड बदलली आहे. इम्रान खानने म्हटलं की, या अभिनेत्यांनी वयानुसार भूमिका स्वीकारायला हव्यात. तिन्ही खान साठीत आहेत आणि त्यांच्या भूमिकांमध्ये बदल आवश्यक आहे. शाहरुखने 'पठाण' आणि 'जवान'ने कमबॅक केलं, पण 'डंकी' अपयशी ठरला. आमिरचा 'लाल सिंग चड्ढा' अपयशी ठरला, पण 'सितारे जमीन पर'ला यश मिळालं. सलमानचे बहुतांश चित्रपट अपयशी ठरले, 'टायगर ३' अपवाद आहे.