आमिर खान रविवारी ५ जुलै रोजी राहत्या घरीच तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात
बॉलीवूड अभिनेता आमिर खान तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. तो ५ जुलै रोजी प्रेयसी गौरी स्प्रॅटबरोबर साधेपणाने लग्न करणार आहे. लग्न वांद्रे येथील निवासस्थानी होणार असून, फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. आमिरची मुलं आणि एक्स पत्नीही या समारंभात सहभागी होणार आहे. आमिर आणि गौरीची भेट बंगळुरूमध्ये झाली होती आणि ते सध्या एकत्र राहत आहेत.