“जे काही होतं ते सगळं…”, अभिषेक बच्चनची ‘ती’ पोस्ट चर्चेत; ऐश्वर्या रायबरोबर बिनसलं?
अभिनेता अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याने स्वतःसाठी वेळ हवा असल्याचे म्हटले आहे. या पोस्टमुळे चाहते संभ्रमात आहेत की ही पोस्ट त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आहे की एखाद्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी. अभिषेक सोशल मीडियावर फार सक्रिय नसल्याने, त्याच्या या पोस्टने चर्चांना उधाण आले आहे. काहींनी याचा संबंध त्याच्या आगामी चित्रपटाशी लावला आहे.