रणबीर कपूरच्या ‘रामायण’मधील VFX वर नेटकऱ्यांची टीका, हृतिक रोशननेही शेअर केली पोस्ट
रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. काहींनी भव्य दृश्ये आणि संगीताचे कौतुक केले, तर काहींनी व्हीएफएक्सवर टीका केली. हृतिक रोशनने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत व्हीएफएक्सबद्दल आपले मत मांडले. त्याने प्रेक्षकांना व्हीएफएक्सच्या विविध शैलींचा आदर करण्याचे आवाहन केले. 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर, यश, साई पल्लवी, रवी दुबे आणि सनी देओल प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपट २०२६ मध्ये दिवाळीला प्रदर्शित होणार आहे.