“माझ्यावर जबरदस्ती करू नका”, मराठी भाषेबद्दल सुनील शेट्टी यांचं वक्तव्य; म्हणाले…
अलीकडे महाराष्ट्रात हिंदी-मराठी भाषेवरून वाद झाला आहे. राज्य सरकारने पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषा सक्तीची केल्यानंतर हा वाद उफाळला. अभिनेता सुनील शेट्टी यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कोणालाही जबरदस्तीने एखादी भाषा बोलायला लावू नये, असे स्पष्ट मत मांडले. मराठी भाषेबद्दल अनादर नाही, परंतु भाषा संवाद आणि नातं जोडण्याचं माध्यम आहे, असे त्यांनी सांगितले.