अंडरवर्ल्डच्या धमकीमुळे धवन कुटुंबावर आली होती घर सोडण्याची वेळ; वरुण धवनचा खुलासा
९० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टी आणि अंडरवर्ल्डचे संबंध सर्वश्रुत होते. अनेक निर्माते आणि कलाकारांना धमकीचे फोन येत असत. अभिनेता वरुण धवनने नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्या कुटुंबाला आलेल्या धमकीच्या फोनबद्दल सांगितले. अंडरवर्ल्डकडून येणाऱ्या फोनमुळे त्यांना घर सोडावे लागले होते. वरुण लवकरच 'है जवानी तो इश्क होना है' या चित्रपटात दिसणार आहे.