“मी त्याला सोडून दिलंय”, २५ वर्षांनी मुंबईत आल्यावर ममता कुलकर्णीचा मोठा खुलासा
'करण अर्जुन' फेम ममता कुलकर्णी २५ वर्षांनी मुंबईत परतली आहे. ड्रग्ज प्रकरणामुळे तिचं करिअर थांबलं आणि ती भारताबाहेर राहिली. मुंबईत परतल्यावर तिने विकी गोस्वामीसोबतच्या नात्यावर भाष्य केलं, त्याच्याशी लग्न केलं नसल्याचं स्पष्ट केलं. २०१५ मध्ये २००० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात तिचं नाव आलं होतं, पण अलीकडेच तिला क्लीन चिट मिळाली आहे.