मराठी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेली ममता कुलकर्णी झाली साध्वी, ‘असा’ होता बॉलीवूडमधील प्रवास
'करण अर्जुन' फेम मराठमोळी अभिनेत्री ममता कुलकर्णी किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली आहे. तिने महाकुंभमध्ये संन्यास घेतला असून तिचे नवीन नाव यमाई ममता नंद गिरी आहे. ममताचा जन्म २० एप्रिल १९७२ रोजी मुंबईत झाला. तिचे फिल्मी करिअर ९० च्या दशकात बहरले होते. सिनेविश्व सोडल्यानंतर ती दुबईला स्थायिक झाली. विकी गोस्वामीबरोबरच्या नात्यामुळे ती चर्चेत राहिली होती.