एक्स बॉयफ्रेंड व त्याच्या मैत्रिणीला जिवंत जाळलं, बॉलीवूड अभिनेत्रीच्या बहिणीला अटक
'रॉकस्टार' फेम नर्गिस फाखरीची बहीण आलिया फाखरी हिला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. एक्स बॉयफ्रेंड एडवर्ड जेकब्स आणि त्याची मैत्रिण अॅनास्तेसिया यांच्या खूनाचा आरोप आलियावर आहे. न्यूयॉर्कमधील क्वीन्स येथे गॅरेजला आग लावल्याने दोघांचा मृत्यू झाला. आलियाला जामीन नाकारण्यात आला आहे. नर्गिसच्या आईने आलियाचा बचाव केला आहे. एडवर्डच्या आईने सांगितले की, ब्रेकअपनंतरही आलिया एडवर्डचा पाठलाग करत होती.