पचनाचे त्रास कमी करण्यासाठी नेहा धुपिया करते ‘हा’ उपाय, अँटी-ब्लोटिंग ड्रिंकची दिली माहिती
अभिनेत्री नेहा धुपियाने ब्लोटिंग आणि पचनाच्या त्रासावर एक सोपं आणि पारंपरिक पेय सांगितलं आहे. हे पेय पोट शांत ठेवण्यास, ब्लोटिंग कमी करण्यास आणि झोपण्यापूर्वी शरीराला आराम देण्यास मदत करतं. हे तयार करण्यासाठी पाण्यात बडीशेप, ओवा, जिरे, आलं आणि लिंबू घालून उकळायचं. नेहाने तिच्या न्यूट्रिशनिस्ट रिचा गंगानी यांचे आभार मानले आणि डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं सुचवलं.