अभिनेत्री राधिका आपटे लग्नानंतर १२ वर्षांनी झाली आई, फोटोमध्ये दाखवली बाळाची पहिली झलक
मराठमोळी बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटे आई झाली आहे. तिने तिच्या बाळाबरोबरचा फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. राधिकाचं बाळ एका आठवड्याचं झालं आहे. राधिका लग्नानंतर १२ वर्षांनी आई झाली आहे. तिने दोन महिन्यांपूर्वी बेबी बंप फ्लाँट करून गुड न्यूज दिली होती. आता ती कामावर परतली आहे. राधिकाने मुलगा की मुलगी याबाबत माहिती दिलेली नाही.