‘धुरंधर २’ बघून पैसे वाया घालवू नका…”, अभिनेत्री रम्या स्पंदनाची सडकून टीका; म्हणाली…
रणवीर सिंहचा 'धुरंधर २' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना अभिनेत्री रम्या स्पंदनाने या चित्रपटावर सडकून टीका केली आहे. एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये रम्याने चित्रपटाला कंटाळवाणा आणि निराशाजनक म्हटले आहे. तिने दिग्दर्शन, संवाद, पार्श्वसंगीत, अभिनय यावरही टीका केली. रणवीरच्या अभिनयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तरीही, प्रेक्षकांचा चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.