रश्मिका मंदाना फेब्रुवारीत विजय देवरकोंडाबरोबर लग्न करणार? ‘त्या’ चर्चांवर म्हणाली…
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. फेब्रुवारीत लग्न होणार असल्याची चर्चा असून, ऑक्टोबरमध्ये त्यांनी हैदराबादमध्ये साखरपुडा केला आहे. मात्र, रश्मिकाने लग्नाबाबत अद्याप स्पष्ट उत्तर दिलेले नाही. ती म्हणाली, योग्य वेळ आल्यावर आम्ही बोलू. रश्मिका आणि विजयने २०१८ मध्ये 'गीता गोविंदम' आणि २०१९ मध्ये 'डिअर कॉम्रेड'मध्ये एकत्र काम केले आहे.