जिच्या प्रेमात होते राज कपूर, तिच्याच मुलीसाठी अभिनेत्याने राज यांच्या लेकीशी लग्न मोडलेलं
कुमार गौरव आणि विजयता पंडित यांनी १९८१ मध्ये 'लव्ह स्टोरी' चित्रपटातून पदार्पण केलं. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते प्रेमात पडले. कुमार गौरवचे वडील राजेंद्र कुमार यांनी त्यांचे नाते मान्य न करता गौरवचे लग्न रीमा कपूरशी ठरवलं. साखरपुड्यानंतरही गौरव विजयताशी संपर्कात होता. नंतर त्याने रीमाशी साखरपुडा मोडून १९८४ मध्ये नम्रता दत्तशी लग्न केलं.