‘धुरंधर २’मुळे ‘भूत बंगला’चे प्रदर्शन लांबणीवर, ‘या’ दिवशी रिलीज होणार अक्षयचा चित्रपट
रणवीर सिंहच्या 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपटाच्या यशामुळे अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांच्या 'भूत बंगला' चित्रपटाची रिलीज तारीख एक आठवडा पुढे ढकलण्यात आली आहे. 'भूत बंगला' आता १७ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होईल, तर १६ एप्रिलला पेड प्रिव्ह्यू सुरू होतील. 'धुरंधर'ने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली असून, 'भूत बंगला'च्या निर्मात्यांनी प्रेक्षकांना उत्तम अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.