“हात लावू नको…”, अमीषासह रोमँटिक सीन करताना बॉबी देओलला संतप्त चाहत्यांनी अडवलेलं
'गदर'मधील सकीना या पात्रामुळे अमीषा पटेलला प्रचंड लोकप्रियता मिळाली. 'हमराज' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जयपुरमध्ये बॉबी देओलला मिठी मारताना चाहत्यांनी तिला 'सकीना' समजून गोंधळ घातला होता. अमीषाने त्यांना हा फक्त चित्रपटाचा भाग असल्याचं सांगितल्यावर ते शांत झाले. 'हमराज'मध्ये बॉबी देओल, अमीषा पटेल, अक्षय खन्ना यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.