अमिताभ बच्चन यांचा नातू नव्हे, तर ‘हा’ लोकप्रिय अभिनेता होता ‘इक्कीस’साठी पहिली पसंती
धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट 'इक्कीस' १ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याने या चित्रपटातून पदार्पण केले आहे. हा चित्रपट भारतीय सैन्याचे शूर अधिकारी अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित आहे. कोविडमुळे चित्रपटाच्या कामात विलंब झाला आणि वरुण धवनऐवजी अगस्त्य नंदाची निवड झाली. दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.