अमिताभ बच्चन यांचं मुलगा अभिषेकबरोबरच्या नात्याबद्दल वक्तव्य; म्हणाले, “विचार वेगळे…”
अमिताभ बच्चन यांनी मुलगा अभिषेक बच्चनबरोबरच्या नात्याबद्दल ब्लॉगपोस्टमध्ये भाष्य केलं आहे. त्यांनी मतभेद असूनही ध्येय एकच असू शकतं असं सांगितलं. त्यांनी तरुण पिढीच्या मतांचा आदर करण्याचं महत्त्व अधोरेखित केलं. सध्या ते केबीसी सीझन १८च्या सूत्रसंचालनात व्यग्र आहेत. चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ते ‘कल्की 2898 एडी’च्या सिक्वेलमध्ये अश्वत्थामाच्या भूमिकेत दिसणार आहेत.