“सर्व ठीक होईल…”, अमिताभ बच्चन यांना चिनी हेअरड्रेसरने दिलेला धीर
अलाहाबादहून अभिनय क्षेत्रात आलेले अमिताभ बच्चन सुरुवातीला संघर्ष करत होते. त्यांच्या अनेक चित्रपटांना अपयश आले, पण १९७३ मध्ये 'जंजीर'ने त्यांचे आयुष्य बदलले. अभिनेत्री बिंदू यांनी सांगितले की, सलग फ्लॉप चित्रपटांनंतर अमिताभ परत जाण्याच्या तयारीत होते, पण एका चिनी हेअरड्रेसरच्या सल्ल्यामुळे त्यांनी निर्णय बदलला. 'जंजीर'नंतर त्यांच्या चित्रपटांनी सलग यश मिळवले आणि त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.