अमिताभ बच्चन त्यांच्या अन् मुलांच्या लग्नाबाबत म्हणाले, “माझे वडील म्हणायचे की…”
'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय शोमध्ये अमिताभ बच्चन स्पर्धकांशी गप्पा मारतात आणि त्यांच्या आयुष्यातील किस्से सांगतात. ताज्या एपिसोडमध्ये वडोदऱ्याचे सॉफ्टवेअर डेव्हलपर आशुतोष सिंह यांनी भाग घेतला. त्यांनी त्यांच्या आई-वडिलांशी संबंध तुटल्याची गोष्ट सांगितली. अमिताभ यांनी त्यांच्या कुटुंबातील विविध संस्कृतींचे उदाहरण देत संवादाची महत्त्वता पटवून दिली. अमिताभ व जया बच्चन यांच्या लग्नाला ५१ वर्षे झाली असून, त्यांच्या कुटुंबात विविध प्रांतांतील विवाह झाले आहेत.