“घरीच दारू पिऊ शकतो”, नाना पाटेकरांनी सांगितलेलं बॉलीवूड पार्टीला न जाण्यामागचं कारण
अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. बॉलीवूडच्या पार्ट्यांपासून दूर राहण्याचं कारण त्यांनी स्पष्ट केलं आहे. पार्टीला जाण्याऐवजी ते घरीच दारू पिणं पसंत करतात. पार्ट्यांमध्ये काही अप्रिय व्यक्ती भेटल्यास मूड खराब होतो, असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या रागीट स्वभावाबद्दल अनिल कपूर यांनी विचारल्यावर नाना पाटेकर म्हणाले की, गैरवर्तन केल्यास त्याला किंमत मोजावी लागते.